आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागवडे घराण्याने कायमच जनतेशी नाळ जपली आहे. सीना काठच्या ऊसउत्पादकांच्या उसाला नागवडे साखर कारखान्याच्या सभासदांप्रमाणेच भाव देणार, त्यात कसलाही दुजाभाव केला जाणार नाही. नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी गावात गट-तट न पाहाता सर्वसमावेशक काम करावे, असा सल्ला सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिला.
तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सीनाकाठच्या घोगरगाव, तरडगव्हाण, थिटेसांगवी, चवरसांगवी, बनपिंप्री येथील नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार नागवडे कारखान्याच्या वतीने राजेंद्र नागवडे व उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या हस्ते करण्यात आला. बाबासाहेब भोस म्हणाले, की गावाच्या विकासकामात लोकसहभाग घेतल्यास, ती कामे चांगल्या पद्धतीने मार्गी लागतात. या भागातील जनतेच्या पाठीशी नागवडे साखर कारखाना खंबीरपणे उभा राहील.
यावेळी नागवडे कारखाना संचालक सुभाष शिंदे, डाॅ. दिलीप भोस, थिटेसांगवीचे सरपंच अर्जुन शेळके, घोगरगावच्या सरपंच सुजाता मिलिंद भोसले, चवर सांगवीच्या सरपंच सुनीता शरद माळशिकारे, किसनराव उगले, बाबासाहेब गावडे, बक्षुदीन शेख, पै. अरुण मोरे, अंबादास उगले, राजेंद्र तरटे, शरद तरटे, आप्पासाहेब उल्हारे, दीक्षा संदीप पाचर्णे, उषा विकास तरटे, शेख मंडब्बी कलिदर, स्वाती अरुण मोरे, महादेव भोसले, मनोहर बचाटे, विलास वाल्हेकर, संतोष बोरुडे, रसुल शेख, धनंजय दाते, संदीप पाचर्णे, बबनराव गुंजाळ, बलभीम गोलवाड, पुष्पाबाई घनश्याम कसाब, साखरबाई बबन पवार, अर्जुनअप्पा वाळके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. कानिफनाथ उगले यांनी, तर प्रकाश बोरुडे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.