आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण:सामाजिक न्याय भवनात येणाऱ्या प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काम करा

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेला जलद, सुलभ व्यवस्था उपलब्ध व्हावी, म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या सर्व सेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या माध्यमातून एकाच छताखाली आणण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय भवनात येणाऱ्या प्रत्येकाच्या प्रश्नांची सोडवणूक होऊन त्यांचे समाधान होण्याच्यादृष्टीने या विभागाने काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नगर शहरातील सावेडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाइन केले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी राज्याचे महसुल, तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, महापौर रोहीणी शेंडगे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार संग्राम जगताप,मोनिका राजळे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सुनिल साळवे, अशोक गायकवाड, समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त भारत केंद्रे यांनी केले तर प्रादेशिक उपायुक्त डॉ. भगवान वीर,समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभला आहे. त्यांचं कार्य जगासाठी दीपस्तंभ ठरेल असंच आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी, समता बंधुता यांची शिकवण देणारे अनेक धडे घालून दिले आहेत. यातूनच आपण एकजूट होणार असल्याचेही ते म्हणाले.

जनतेला जलद, सुलभ व्यवस्था उपलब्ध व्हावी, म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या सर्व सेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या माध्यमातून एकाच छताखाली आणण्यात आल्या आहेत. प्रास्ताविक समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त भारत केंद्रे यांनी, तर आभार प्रादेशिक उपायुक्त डॉ. भगवान वीर यांनी मानले.

विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत जाईल
पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम इमारतीच्या माध्यमातून होणार असल्याने जिल्ह्याच्या विकासात भर टाकणारी ही इमारत ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...