आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नवचैतन्य व विचारांचा झंझावात घेऊन जनसामान्यांमध्ये कार्य करत आहे. पक्ष बळकट करण्याच्या उद्देशाने नव्याने पक्ष बांधणी सुरु झालेली अाहे. सर्वसामान्य केंद्रबिंदू ठेवून सामाजिक बांधिलकीने प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता योगदान देण्यास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती जिल्हा पक्ष कार्यालयात पदाधिकार्यांच्या नियुक्त्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी प्रवक्ते संजीव भोर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख सचिन जाधव, बाबुशेठ टायरवाले, बंडू रोहोकले आदी उपस्थित होते. नियुक्त कार्यकारिणीत दलित आघाडी प्रमुख- पोपटराव पाथरे, युवा सेना नगर उपतालुका प्रमुख सचिन ठोंबरे, उपशहर प्रमुख आनंद वाळके, युवा सेना उपशहर प्रमुख अक्षय शिंगवी, प्रसिध्दी प्रमुख प्रल्हाद जोशी, युवा सेना जिल्हाप्रमुख (शेवगाव-पाथर्डी) साईनाथ आधाट, संघटक (राहुरी, शेवगाव, पाथर्डी) अमोल हुबे, युवा सेना शहर प्रमुख महेश लोंढे, उपजिल्हाप्रमुख (शेवगाव) दिलीप भागवत, युवा सेना जिल्हा प्रमुख आकाश कातोरे आदींची नियुक्ती केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.