आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:धोबी-परीट समाज महासंघाचे नागपुरात कार्यकर्ता संमेलन : सोनटक्के

नगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य धोबी -परिट समाज महासंघाच्या वतीने शुक्रवारी ५ ऑगस्टला नागपूरातील रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात “कार्यकर्ता संमेलना’चे तसेच पुरस्कार वितरण, गुणवंतांचा गौरव सोहळा व उत्कृष्ट पत्रकारिता काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे. महासंघातर्फे स्व. रमाकांत कदम यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या पत्नी सुरेखा कदम व राजेंद्र आहेर यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी.डी. सोनटक्के यांनी दिली.

कार्यकर्त्या संमेलनात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. त्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मोहन मते, आमदार टेकचंद सावरकर, आमदार प्रवीण दडके, माजी आमदार योगेश टिळेकर, कल्याणराव दळे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर सोनवणे व माजी आमदार तथा राष्ट्रीय रजक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश चौधरी यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी महासंघाचे कार्याध्यक्ष अनिल शिंदे,मुख्य महासचिव जयराम वाघ, कोषाध्यक्ष संजय कनोजिया, महिला प्रदेशाध्यक्ष अरुणा रायपुरे, महासचिव संजय सुरडकर, प्रदेश समन्वयक रुकेश मोतीकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष भैय्या रोहनकर, सुहास मोगरे, लॉन्ड्री प्रदेशाध्यक्ष सुनील पवार, प्रदेशाध्यक्ष मनोज मस्के, राजेश मुके, सचिन कदम, अरविंद तायडे, गणेश खर्चे, रमेश बुंदेलखंडे, दादाराव बाभुळकर, दीपक बाविस्कर संदीप रोहनकर आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व भाषिक महासंघाचे राज्याचे सचिव सुधाकरराव पवार, संतोष वाघ, दीपक दळवी, शिवाजी तळेकर, भरत जाधव, विठ्ठलराव रंधे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...