आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांचे गुण कार्यकर्त्यांनी आत्मसात करावे:विजया रहाटकरांचे आवाहन, म्हणाल्या- मोदी भारतीयांचे आशास्थान

अहमदनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात आजही गरिबांसाठी काम करण्याची गरज असल्याने पक्षाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवाकार्याने साजरा केला आहे. अशा उतुंग व्यक्तिमत्वाचे काही गुण कार्यकर्त्यांनी घेऊन आत्मसात करावे. असे आवाहन शुक्रवारी (23 सप्टेंबर) भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी केले.

सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून देशात सर्वात मोठे सेवाकार्य उभे राहिले आहे. देशाला दिशा देणारे, सर्व भारतीयांचे आशास्थान व गोरगरीब जनतेचा आधार मोदी आहेत. जनतेने ही सत्ता उतमात करण्यासाठी नव्हेतर सेवा करण्यासाठी दिलेली आहे अशी त्यांची विचारसरणी आहे. यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात सुरु असलेल्या सेवा पंधरवड्या अंतर्गत शहर भाजपच्या वतीने भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये बुद्धीजीवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.या संमेलनासाठी वकील, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक असे विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी उपस्थित होती.

सेवाभाव जपत काम

यावेळी रहाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचे पैलू उलगडत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनास 20 वर्ष तर पंतप्रधान म्हणून 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशाच्या उन्नतीसाठी अतिशय उत्तम कर्म त्यांनी आजपर्यंत केले असल्याने ते कर्मयोगी आहेत. अंत्योदयचा विचार ते प्रत्यक्षात आणत सेवाभाव जपत काम करत आहेत.

राम मंदिराचा प्रश्न सोडवला

इंग्रजांच्या काळातील कायदे बदलण्या बरोबरच जुनी शिक्षण पद्धतही त्यांनी बदलली असल्याने मोठे अमूलाग्र बदल या क्षेत्रांमध्ये होत आहेत. 500 वर्षापासून आपण वाट पाहत असलेल्या राम मंदिराचा प्रश्न त्यांनी किती सहजपणे सोडवला. असे त्यांनी सांगितले.

शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सुरेखा विद्ये, प्रदेश सदस्या गीता गिल्डा, शहर अध्यक्षा अंजली वल्लाकटी, माजी उपमहापौर गीतांजली काळे, मालन ढोणे, संगीता खरमाळे, अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन दीप्ती गांधी, जेष्ठ नेते सुनील रामदासी, वसंत लोढा, ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, सरचिटणीस महेश नामदे, तुषार पोटे, बाळासाहेब भुजबळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

राजकारण महिला केंद्रित

महेंद्र गंधे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 8 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या भरपूर कामाचे अवलोकन व विमोचन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भविष्यात भारताचे राजकारण महिला केंद्रित असणार आहे. त्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त सक्रीय होत काम करावे.

बातम्या आणखी आहेत...