आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा:नर्मदा परिक्रमेनिमित्त विखे यांचे हस्ते पूजन ; महंत उद्धव महाराज मंडलिक यांचा होणार सन्मान

लोणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरदविनायक सेवाधामचे संस्थापक महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे आई-वडील विश्वनाथ महाराज मंडलिक व सुमनताई विश्वनाथ मंडलिक हे दांपत्य एक डिसेंबर पासून नर्मदा परिक्रमेसाठी ओंकारेश्वर येथे रवाना होत आहेत. त्यानिमित्ताने लोणी येथील वरदविनायक सेवाधाम येथे त्यांचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विखे यांनी यात्रेकरूंची आपुलकीने विचारपूस करून या वृध्दापकाळात देखील परिक्रमेस जात आहात याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. आपल्या सर्वांची यात्रा सुखकर होवो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार राठी, दिपक महाराज देशमुख, शरद शिंदे, भारत धावणे, सीताराम ढुस, भागवत चोळके, साहेबराव जपे, गंगाधर चौधरी, किसन दादा विखे, राहुरी कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, सीताराम झिने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...