आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन कार्यक्रम आयोजित:काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त पुष्पहार आणि अभिवादन

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर जिल्हा युवक काँग्रेस, भिंगार शहर युवक काँग्रेस व शहर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंती निमित्त वाडिया पार्क येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते खलील सय्यद, श्यामराव वागस्कर, नईम शेख, समीर बागवान, रफिक शेख, सागर इरमल, शहाबाज शेख, राजू शेख, आय. बी. शहा, खलील भाई सय्यद इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खलील सय्यद म्हणाले, शहरात युवक काँग्रेस व अल्पसंख्यांक काँग्रेस हे दोन्ही विभाग कोणत्याही गटात सहभागी न होता नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन संयुक्तपणे कार्य करत आहेत. अशीच एकी व समन्वय यामध्ये सातत्य राहिल्यास काँग्रेस पक्षाची शहरात प्रतिमा उंचावण्यास वेळ लागणार नाही.

परंतु नवीन पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे दुरावत चाललेले कार्यकर्ते जवळ कसे येतील, याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. भिंगार हे नगर शहराचा भाग आहे. शामराव वागस्कर यांचे सर्व सहकारी नवनियुक्त युवक अध्यक्ष भूषण चव्हाण यांची मदत यापुढील काळात मोलीची ठरेल.

बातम्या आणखी आहेत...