आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबी. पी. एच. एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज तीन दशकांहून अधिक काळ व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेला राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रमाणन परिषद बंगलोरकडून ए प्लसने पुन्हा मान्यता मिळाली आणि ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त करणारी आहे.
ग्रंथालयाला डिस्कव्हरी मीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून बी-स्कूल लायब्ररी पुरस्कार - २०१३ प्राप्त झाला. नवी दिल्ली लर्निंग रिसोर्स सेंटर (लायब्ररी) एक दशकाहून अधिक काळ “लेखक वाचक संवाद - एक बुक टॉक शो” आयोजित करत आहे. लायब्ररी आणि विद्यार्थीनी मंच (महिला सेल) यांनी या कार्यक्रमासोबत “वार्षिक पारितोषिक वितरण” आणि “दंत जागरूकता आणि काळजी” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेने प्रमुख लेखक प्रा. अतुल कहाते आणि डेंटल सर्जन डॉ. प्राची पाटील यांना १ एप्रिल २०२२ रोजी संस्थेचे सभागृहात आमंत्रित केले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, डॉ. एम.बी. मेहता संचालक यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. पाहुण्यांचा सत्कार व त्यानंतर डॉ. प्राची पाटील यांचे भाषण झाले.
पाटील हॉस्पिटल व आयएमएस विद्यार्थी मंच यांच्या वतीने विद्यार्थी दंत तपासणीच्या शिबिराचे सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत शिबिर आयोजन चार व पाच एप्रिल २०२२ घोषित केले. प्रा. कहाते म्हणाले, कुटुंबातील सर्वजण पेशाने डॉक्टर आहे पण त्या क्षेत्रात रस नव्हता व प्रवेशासाठी पात्रता व योग्यता नाही, असे त्यांनी सांगितले. ग्रंथालय व विद्यार्थिनी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात लायब्ररीच्या एकपात्री स्पर्धा आणि सर्वोत्कृष्ट वापरकर्ता पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ पार पडला आणि पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
यावेळी विद्यार्थी वाचनालय समितीचे सदस्य प्रसन्ना कुलकर्णी, मिहिका गवळी, तानिया नारंग, अक्षता गांधी, श्रावणी तांबोळी, सेजल मुनोत, आशिष शेख यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. गायत्री रसाळ, अदिती मोहिते, प्रणिता बेंद्रे, रुतुजा औताडे आणि कांचन डांगे या विद्यार्थिनींनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.