आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठव्या जागतिक योग दिनानिमित्त योग विद्या धामतर्फे आयोजित योग दिंडीत वारकऱ्यांच्या योग घोषणांनी सावेडी परिसर दुमदुमला. बालचमूंसह योगसाधकांच्या आसन प्रात्यक्षिकांनी नगरकरांना थक्क केले.
जागतिक योग दिनानिमित्त योग विद्या धाम संस्थेतर्फे शहर व उपनगरामध्ये आयोजित विविध कार्यक्रमांतर्गत रविवारी (१९ जून) सकाळी सावेडी परिसरातून योग दिंडी काढण्यात आली. यामध्ये योगाचा संदेश देणाऱ्या घोषणांनी योग वारकऱ्यांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी विविध चौकांमध्ये साधकांनी योगासनांचे अवघडातील अवघड प्रकार रस्त्यावर करून दाखवले. या साधकांची शारीरिक लवचिकता पाहून नगरकर अक्षरशः थक्क झाले. यावेळी योग शिक्षक अनिरुद्ध भागवत संचालित योग चैतन्य संस्कार वर्गातील बालचमूंनी उपस्थितांची मने जिंकली. पतंगासन, चक्रासन, शीर्षासन, भूनमनासन, आसन, मयूरासन, बकासन, हलासन, उत्थित पद्मासन या व इतर आसनांची प्रात्यक्षिके यावेळी त्यांनी दाखवली. पहाटे सकाळी सहा वाजता योगभवन भिस्तबाग रोड येथून दिंडीला प्रारंभ झाला. यावेळी योग विद्या गुरुकुलच्या साधकांनी गायलेली योग गिताचे ध्वनिमुद्रण लावण्यात आले होते. प्रोफेसर कॉलनी चौक, क्रीडामहर्षी दिनुभाऊ कुलकर्णी क्रीडांगण (सावेडी जॉगिंग ट्रॅक) भिस्तबाग चौक येथे योगाची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. योग भवन येथे दिंडीचा समारोप झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.