आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'योगयोगेश्वर' शंकर महाराजांचा अवतार:संकटकाळात भक्तांच्या जीवनात निर्माण केले स्थैर्य, विशेष देखाव्याचे नगरमध्ये उद्घाटन

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शंकर महाराजांचा महिमा आगाध आहे. त्यांनी मानवजातीच्या कल्याणसाठी आपले आयुष्य वेचले. भक्तांच्या संकटात धावून जाऊन त्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण केले. त्यांच्या विविध रुपातील लिला या भक्तांना मोहून टाकणार्‍या आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित मालिकाही सुरु असल्याने त्यांचा कार्याची प्रचिती सर्वदूर पसरत आहे, असे प्रतिपादन राजाभाऊ कोठारी यांनी केले.

महावीर प्रतिष्ठानने श्री गणेशोत्सवात शंकर महाराजांचा अवतार हा देखावा सादर करुन शंकर महाराजांचे कार्य अधिक व्यापक होईल, असे ते म्हणाले. माणिक चौक येथील महावीर प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त यंदा ‘योगयोगेश्वर शंकर महाराजांचा अवतार’ या देखाव्याचे उद्घाटन राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते झाले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, मर्चंटस् बँकेचे संचालक आनंदराम मुनोत, संजय चोपडा, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, शैलेश मुनोत, सुवेंद्र गांधी, कमलेश भंडारी, संतोष गांधी, किशोर गांधी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा, राकेश भंडारी, स्वप्नील मुनोत, प्रसाद बोरा, आदि उपस्थित होते.

अडचणीतील लोकांना मदतीचा हात

उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले, महावीर प्रतिष्ठानचे कार्यकार्ते समाजाभिमुख कार्य करणारे आहेत. गणेशोत्सवात चांगले देखावा सादर करुन प्रबोधनात्मक कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे अडचणीतील लोकांना मदतीचा हात देण्याचा त्यांचे उपक्रम कौतुकास्पद असेच आहे. सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे, असे सांगितले.

प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंची सेवा

याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा म्हणाले, महावीर प्रतिष्ठान नेहमीच गणेशोत्सवात सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक देखाव्यातून नगरकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळले आहे. मंडळाने यंदाच्या वर्षी ‘शंकर महाराजांचा अवतार’ हा देखावा सादर करत त्यांचा महिमा भाविकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना काळात प्रतिष्ठानने अन्नदानसारखा उपक्रम राबवून गरजूंची सेवा केली आहे. असेच कार्य यापुढेही सुरु राहील, असेही ते म्हणाले.

सूत्रसंचालन राकेश भंडारी यांनी केले तर आभार स्वप्नील मुनोत यांनी मानले. कार्यक्रम यशस्विततेसाठी रोहित भंडारी, निखिल गांधी, रोहन बोरा, आनंद मुनोत, श्रीपाद शिंगी, पुष्कर तांबोळी आदिंनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...