आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक:चांगला शिक्षक होण्यासाठी बदलही स्वीकारावे लागतील

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाईन शिक्षण प्रणालीत बहुतेक शिक्षक अजूनही बालवाडीतच आहेत. त्यामुळे भीतीपोटी नव्हे तर, बदलत्या काळाची गरज म्हणून शिक्षकांना ही प्रक्रिया समजून व शिकून घ्यावीच लागेल. चांगला शिक्षक होण्यासाठी बदल स्वीकारावेच लागतील, अशी भूमिका गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे यांनी व्यक्त केली.

नगर तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित व्ही स्कूल ॲप आशय निर्मिती उपक्रमात शिक्षकांचा गौरव करताना ते बोलत होते. यावेळी विस्तार अधिकारी निर्मला साठे, विस्तार अधिकारी मंदाकिनी लोटके, ओपाच्या डायरेक्टर ऋतुजा जवे व राहुल बांगर, मुख्याध्यापक सुनील अकोलकर, समन्वयक प्रिया कुलकर्णी, सुधीर जोगदंड, तंंत्रस्नेही अमोल मुरकुटे उपस्थित होते. यावेळी अकबर शेख, सिंधू करपे, चंद्रशेखर डोंगरे, वर्षा भोईटे, जयश्री लांडगे, स्वाती अहिरे, जालिंदर सांगळे, संगीता गुंड यांना सन्मानित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...