आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोपरगावसाठी काय करायचे तुम्ही सांगा, काय पाहिजे ते सांगा, हे सर्व तुम्हाला सांभाळायचे आहे. तेव्हा तुमचा त्यात सहभाग काय आहे हेही मला सांगा, बघा मी तुम्हाला सर्वांना कामात व्यस्त करतो. यासाठी मी तुम्हाला आठवड्याची मुदत देतो. इतरांप्रमाणे मी तुम्हाला वाट पाहायला लावणार नाही. आठव्या दिवशी मी येथे हजर होतो. वर्षातील ३६५ दिवस आपली अडचण सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही फक्त काम करण्यासाठी तयार व्हा, मी तुम्हाला सर्व देतो, अशी ग्वाही अभिनेता सोनू सूद यांनी दिली.
कोपरगाव येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम हॉस्पिटलमधील २६ आशा सेविकांना बुधवारी (४ मे) रोजी सायकल वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. प्रास्ताविक मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले. विनोद राक्षे यांनी अभिनेता सोनू सूद यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी अभिनेता सोनू सूद यांच्या दातृत्वाचा गौरव केला.
सोनू सुद म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी मी काहीच नव्हतो. त्यावेळेस तुम्ही मला विचारले असते, तर मी तुम्हाला काही सांगू शकलो नसतो. परंतु ज्या वेळेस साडेसात लाख लोकांची घरवापसी केली. त्यामुळे मी त्यांच्याशी जोडलो गेलो. त्यात सर्व स्तरातील लोकांमुळे आज काश्मीर ते कन्याकुमारी माझे एक नेटवर्क सिस्टीम उभी राहिली. त्या माध्यमातून मी प्रत्येक लहान मोठ्या शहरातील व गावाशी जोडला गेलो. आम्ही त्यांना जे काम देतो ते त्यांच्या जबाबदारीवर आज पार पाडीत आहे. लोक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आले, तर ते कोपरगावला तुमचे काम बघण्यासाठी पुन्हा आली पाहिजे.यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष स्नेहलता कोल्हे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, कार्यक्रमाचे आयोजक विनोद राक्षे, बबलू वाणी, संदीप देवकर, राजेंद्र सोनवणे, बिल्डर याकूब शेख, डॉ. अजीम शेख, डॉ. कांडेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन करून आभार पालिका अधिकारी महारुद्र गलाट यांनी मानले. आरोग्य विभाग सुनील आरणे यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.