आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरप्रांतीय बांधकाम मजुरांनी ठेकेदारावर गोळीबार करण्याचा धक्कादायक प्रकार तालुक्याच्या दुर्गम भागात मांडओहोळ परिसरात घडला. गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात ठेकेदार स्वप्निल आग्रे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामसुरक्षा दलाने सतर्कता दाखवत या प्रकरणातील तीन आरोपींना अवघ्या ३ तासांत पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
शक्ती नारायण राय, नितीश गुड्डू व रेशू हिरालाल यादव (तिघेही परप्रांतीय, हल्ली रा. खडकवाडी, पारनेर) असे आरोपींची नावे आहे. ठेकेदार आग्रे मजुरीचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने आपण त्यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली हल्लेखोरांनी दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली. माहितीनुसार, आग्रे मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कारमधून (एमएच ०४ ईएस ८१४७) म्हसोबा झाप या आपल्या गावाकडे निघाले होते. म्हसोबा झाप येथे पोहचण्यापूर्वीच एका दुचाकीवरून आलेल्या तिन्ही आरोपींनी आग्रेची कार थांबवून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यात पैशांवरून बाचाबाची सुरू असताना तिघांपैकी एकाने आग्रे यांच्यावर गावठी कट्टयातून गोळया झाडल्या. त्यात आग्रे यांच्या छातीच्या उजव्या बाजूला दोन गोळ्या घुसल्या. गोळीबारानंतर घाबरलेल्या रेशू हिरालाल यादवने घटनास्थळावरून दुचाकी घेऊन पळ काढला. तर इतर दोघे आग्रे यांची कार घेऊन वारणवाडीच्या दिशेन फरार झाले होते. ग्रामसुरक्षा दलाने त्यांना पकडून दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.