आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढरकवडा (पिसगाव) येथील शेतातील घटना:युवा शेतकऱ्याने घेतले विष ; चंद्रपुरात उपचारादरम्यान मृत्यू

मारेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पांढरकवडा येथील युवा शेतकऱ्याने विष घेतले. दरम्यान, उपचारांकरिता चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशात मंगळवार, दि. ६ सप्टेंबर रोजी शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सतत होत असलेल्या आत्महत्येने संपूर्ण तालुका हादरला आहे. सुधीर रवी गोलर वय २८ वर्ष, असे विष घेऊन जीवनयात्रा संपवलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

पांढरकवडा (पिसगाव) येथील सुधीर गोलर यांनी रविवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वडगाव शिवारातील शेतात विष प्राशन केले. ही बाब लगतच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लगेच घटनास्थळावर धाव घेऊन त्याला उपचारांकरिता चंद्रपूर येथे हलविले. अशात मंगळवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सुधीर गोलर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताच्या पश्चात आई, एक भाऊ आहे. सततची नापिकी आणि कर्जाची परतफेड कशी करावी, ह्या विवंचनेत असलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडत आहे. गेल्या दीड महिन्यात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले आहे. सतत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...