आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवचरित्रातून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आई-वडिलांचा आदर सन्मान तरुणांनी शिकला पाहिजे. कठीण प्रसंगात संघर्षाच्या काळात कसे वागायचे हे पुरंदरचा तह, अफजलखानाच्या आक्रमण, शाहिस्तेखानाची फटफजिती यातून प्रेरणा घेऊन शिकावे, असे प्रतिपादन प्रा. यशवंत गोसावी यांनी केले. परतूर तालुक्यातील आष्टी येथे व्यापारी महासंघाच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्त आयाेजित व्याख्यानात ते बोलत होते. प्रा. गोसावी यांनी शिवचरित्र व आजचा समाज या विषयावर मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष हस्तीमल बंब, आष्टी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण टेकाळे, हबिब शेख, भागवत जगताप, नारायण वांशिबे, नितीन जेथलिया, रामप्रसाद थोरात, मधुकर मोरे, नसरुल्लाखाॅन पठाण यांची उपस्थिती होती. प्रा. गोसावी म्हणाले, जिजाऊ पूजन , शिव पूजन प्रत्येक शुभप्रसंगी झालीच पाहिजे परंतु आरती नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही जाती धर्माच्या चौकटीतील नव्हते तर त्यांनी अठरापगड जातीला एकत्र करून मावळ्यांच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण केलेले आहे.
सुत्रसंचलन धनराज मलाडे यांनी तर कृष्णा टेकाळे यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, सकाळी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. शाळकरी मुलांनी लेझीम पथकाद्वारे कवायती सादर केल्या. तसेच रक्तदान शिबीर घेऊन यात ७१ दात्यांनी रक्तदान केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.