आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:कणखर मानसिकता ठेऊन तरुणांनी जीवनात वाटचाल करावी ; आव्हाड

पाथर्डी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास जीवनातील कोणतेही ध्येय गाठता येऊ शकते. जागतिक मंदीच्या लाटेत नोकऱ्यांच्या संधी कमी होत आहेत. विद्यार्थी तरुणांनी कणखर मानसिकतेतून उद्योगांकडे वळल्यास ते या क्षेत्रातही यशस्वी होऊ शकतात, असे प्रतिपादन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले. बाबुजी आव्हाड महाविद्यालयात अनुराधा फुंदे-केदार यांची मोहटादेवी सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, पोपट फुंदे, सुनील कचरे, सचिन पालवे, प्रवीण बेळगे, प्रदीप वारुळकर, अनिल नारखेडे उपस्थित होते. यावेळी फुंदे यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात आदर्श व्यक्ती बनण्याचा व आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवण्याचा सल्ला दिला. मोहटादेवी गडाला राज्यातच नव्हे तर देशभरात नावलौकिक मिळवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन, सर्व भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करण्याचे कार्य करण्याची, ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक शेखर ससाने व सूत्रसंचालन मन्सूर शेख यांनी केले. आभार आशा पालवे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...