आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:शौचालयात गळफास घेत युवकाने केली आत्महत्या; आकस्मात मृत्यूची नोंद

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पठार भागातील खंदरमाळवाडीच्या लहुचामळा येथील किरण दिलीप मंडलिक (वय २३) या युवकाने घराशेजारील शौचालयात लोखंडी गजाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

घटना सोमवारी रात्री घडली. किरण आई-वडिलांसोबत राहत होता. ते झोपल्यानंतर त्याने आत्महत्या केली. गणपत विठ्ठल मंडलीक यांच्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तपास सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...