आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:रोटाव्हेटर खाली दबून तरुणाचा मृत्यू

संगमनेर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटाव्हेटर मध्ये गुंतलेला चिखल काढत असताना तरुण शेतकऱ्याचा रोटाव्हेटर खाली दबून मृत्यू झाला. ही दुर्घटना तालुक्यातील ओझर खुर्द सोमवारी दुपारी घडली. पुंजा धोंडीबा शिंदे (वय ३९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पुुंजा शिंदे आपल्या शेतीत ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर मारत होते.

रोटाव्हेटरमध्ये चिखल गुंतल्याने तो काढत असताना अचानक ट्रॅक्टर पुढे सरकल्याने रोटाव्हेटर थेट पुंजा शिंदे यांच्या छाती आणि पोटावर पडला. ही घटना लोकांनी पाहिल्यावर त्यांनी धाव घेतली व शिंदे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यांच्यावर सोमवारी ओझर खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...