आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या कडक उन्हाळा असल्याने रक्तदान शिबिराची संख्या कमी असते आणि रक्तदान संकलन मंदावले जाते परिणामी रक्ताचा तुटवडा जावणतो, याचे भान ठेवून जनकल्याण रक्तपेढी येथे सोमवारी (९ मे) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान करण्याच्या आवाहनाला युवकांनी उत्तम प्रतिसाद दिला. युवकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येऊन रक्तदानाची चळवळ उभी करणे आवश्यक आहे. त्या साठी प्रेरणास्थान असणे आवश्यक आहे, असे शिबिराचे संयोजक भरत झंवर यांनी सांगितले.
या शिबीरात जयंत भागवत यांनी आजपर्यंत (१११ वेळा) रक्तदान करून एक मोठा आदर्श घालून दिला. प्रसाद बर्वे, नगर सायकलिस्टचे नितीन पाठक व प्रथमेश बर्डे, योगेश सोहोनी, संयोजक झंवर, भास्कर गायकवाड, महादेव गरड, अभिजित कासार, चंद्रशेखर रामदासी, चंद्रशेखर मुळे, प्रशांत वाडकर, आदित्य मिसाळ, आदित्य बारवकर, ओंकार वालझाडे, मृण्मयी जोशी, मृणाल कुलकर्णी, पंकज धिमते आदींनी रक्तदान केले. या शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढी मधील मुकेश साठे, अनघा चावरे, डाॅ.वसंतराव झेंडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास मढीकर, सुशांत पारनेरकर, सोनाली खांडरे, सागर उंडे, शरद बळे, अनिता तरटे, सुलभा पवळ, गयाबाई चव्हाण, शंकर खंडागळे यांचे सहकार्य लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.