आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्ती क्षेत्र:युवकांनी कुस्ती क्षेत्राकडे वळावे : आमदार जगताप

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगर शहराला द्या आम्ही ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडू नगर शहराला कुस्तीचा वारसा लाभला आहे तो जोपासण्यासाठी काम करायचे आहे. सध्या जिमचे फॅड आले आहे.त्यामुळे पैलवान कोल्हापूरला जायचे बंद झाले आहेत. युवकांना कुस्ती क्षेत्राकडे वळविण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र केसरी स्पर्धा कमिटीचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी वाडिया पार्क मैदानाची पाहणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, सचिव अमृता भोसले, दयानंद भट्ट, सुभाष ढोले, चंद्रकांत शिंदे, युवराज घोरपडे, विजय कुरणे, संतोष भुजबळ, शिवाजी चव्हाण,प्रवीण घुले, शिवाजी कराळे, गुलाबराव बर्डे,अनिल गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.जगताप म्हणाले,मोबाईल सारखे साधन युवकांच्या हातात पडले आहे त्यांना व्यायामाकडे वळविणे गरजेचे आहे नगर शहराच्यावतीने कुस्तीगीर परिषदेचे राज्याच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला आहे. अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्याची मागणी केली असल्याचे जगताप यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...