आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार:युवकांना मिळणार मोफत औद्योगिक कौशल्याचे धडे ! ; ऑटो क्लस्टरमध्ये प्रशिक्षणाबरोबरच 3 ते 6 हजार रुपये पगारही

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील विविध क्षेत्राच्या संबंधित असलेल्या १९ क्लस्टरपैकी नगर शहरातील ऑटो क्लस्टरमध्ये आता बेरोजगार युवकांना मोफत औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे.या क्लस्टरमध्ये प्रशिक्षणाबरोबरच युवकांना ३ ते ६ हजार रुपये महिना देखील मिळणार आहे. ऑटो- इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये १५ जूनपासून पहिल्या बॅचला प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागात रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग वाढीसाठी देशभरात क्लस्टर सुरु केले आहेत. भारतात सध्या १९ विविध क्षेत्राच्या संबंधित क्लस्टर सुरु आहेत.या क्लस्टरसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. “ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर हे क्लस्टर सुरू आहेत.नागापूर औद्योगिक वसाहतीतील ऑटो क्लस्टरमध्ये यापूर्वी ३२ जणांना प्रशिक्षण देऊन ते विविध खासगी कारखान्यांमध्ये रुजू देखील झाले आहेत.

प्रशिक्षणानंतर थेट मिळणार रोजगार ^ दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व अपंगांना या क्लस्टरमध्ये सीएनसी प्रोग्रामर ऑपरेटर, मशीन इलेक्ट्रिकल मेंटेनेस, मशिनिस्ट, ॲडव्हान्स वेल्डर, इलेक्ट्रिकल वाईंडर हे १५ ते २४ महिन्यांचे हे प्रशिक्षण दिले जाणार असून, विद्यार्थ्यांना तीन ते सात हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे.'' विनोद जहागीरदार, प्रमुख, अहमदनगर ऑटो इंजिनियरिंग असोसिएशन.

बातम्या आणखी आहेत...