आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा युवक महोत्सव:युवकांनी कलेच्या क्षेत्रात कतृत्व सिद्ध करण्याची गरज - राधाकृष्ण विखे

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कलेच्या क्षेत्रात वयाची मर्यादा नसली तरी या क्षेत्रात कतृत्व सिद्ध करण्याची गरज आहे, हे स्पष्ट करत कृषी विद्यापीठातील इंद्रधनुष्य हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा तसेच उद्याचा नायक ठरवणारा असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल व दुग्धविकास तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात शनिवारी 5 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या इंद्रधनुष्य या 18 व्या युवक महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कुलगुरु डॉ. प्रशांत पाटील, विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कारभारी काळे प्रमोद पोखरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी इंद्रधनुष्य या माहिती पुस्तिकेचे विमोचन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 5 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत चालणाऱ्या या युवक महोत्सवात 21 विद्यापीठाचे 1100 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

कुलगुरू डाॅ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, कला व राजकारणात हार-जीत होत असते. मात्र ध्येय असेल, तर यश निश्चित मिळते. 6 हजार 700 एकर क्षेत्र असलेले राहुरी कृषी विद्यापीठ सर्वात जास्त सीडस््चे उत्पादन घेण्यात देशात पहिले ठरले. कृषी विद्यापीठातीन ड्रोन, हवामान केंद्र, देशी गायीचा प्रकल्प हा देखील देशात एक नंबर असल्याचे कुलगुरू डाॅ. पाटील यांनी स्पष्ट केले.

विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे म्हणाले, कष्ट तुम्हाला इच्छा स्थळापर्यंत घेऊन जातील. राजकारण व अभिनय हे क्षेत्र नोकरी सारखे परमनंट नाही. मोठेपण क्षणिक असून जीवनात न घाबरता निरागस राहून स्वत:च्या मनासारखे वागा. जास्त टेन्शन घेऊ नका. कुठे जायचे ते ठरवून घ्या, अन्यथा नजर हटल्यास गुवाहाटीत सापडतात, असे गणेशपुरे यांनी म्हणताच कार्यक्रमात हशा पिकला.

यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, कृषी कार्यकारी परिषद सदस्य प्रदीप इंगोले, दत्तात्रय उगले, तुषार पवार, दत्तात्रय पानसरे, रावसाहेब चाचा तनपुरे, शिवाजी सोनवणे, आर. आर. तनपुरे, अविनाश बाचकर, इंद्रधनुष्यचे समन्वयक डॉ. प्रमोद पाब्रेकर, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहा आदी उपस्थित होते.

इंद्रधनुष्य कार्यक्रमाला 18 वर्षांची यशस्वी परंपरा असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणारे हे व्यासपीठ आहे. सोशल मीडियाचा व्यक्तीगत जीवनात प्रभाव वाढल्याने जवळच्या माणसाशी जिव्हाळा व प्रेमाचा ओलावा कमी झाला. सोशल मीडियाचा वापर कमी करून लोकांशी प्रत्यक्षात संपर्क वाढवा, असाही सल्ला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...