आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Zero Number Of Positive Patients In Rural Areas After 5 Months; 1 In Urban Areas, 2 In Bhingar, 1 In Other Districts, Only 4 Positive Patients In A Day | Marathi News

रुग्ण संख्येत घट:5 महिन्यानंतर ग्रामीण भागात  पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शुन्यावर; नगर शहरात 1, भिंगार 2 अन्य जिल्ह्यातील 1 असे दिवसभरात केवळ 4 पॉझिटिव्ह रुग्ण

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर व जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत तब्बल पाच महिन्यानंतर सर्वात मोठी घट सोमवारी झाली असून पाच महिन्यापूर्वी ५ नोव्हेंबर २०२१ ला नगर जिल्ह्यात १०९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सोमवारी प्रथमच नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांत दिवसभरात एकाही पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली नाही. मात्र, नगर शहरात १, भिंगार २ व अन्य जिल्ह्यातील १ अशा ४ रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी सर्वात कमी ५ रुग्णांची नोंद होती.

नगर जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या मोठ्या संख्येने होती. मात्र नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात रुग्ण संख्या कमी होऊ लागली होती. मार्च महिन्यात तर रुग्ण वाढीचा दर अत्यंत कमी झाला होता. यापूर्वी २९ मार्चला नगर जिल्ह्यात ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सोमवार (४ एप्रिल) ला सर्वात कमी ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. नगर शहरात १, भिंगार २ व अन्य जिल्ह्यातील १ अशा ४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. अन्य तालुक्यात मात्र एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.

या तालुक्यांत कोरोना रुग्ण संख्या शून्यावर
नगर जिल्ह्यातील अकोले, जामखेड, कर्जत, कोपरगाव, नगर, राहुरी, नेवासे, पारनेर, पाथर्डी, राहाता, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदे, श्रीरामपूर या १४ तालुक्यांत प्रथमच सोमवारी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. पहिल्या लाटेत ग्रामीण भागातील संगमनेर, पारनेर तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत होते. दुसऱ्या लाटेत सर्वच तालुक्यात रुग्ण संख्या मोठी होती.

बेडवर दाखल होणारे रुग्णही शुन्यावर
वर्षभरापुर्वी पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढल्याने एप्रिल, मे महिन्यात ऑक्सीजन बेडचा तुटवडा होता.त्याचबरोबर औषधांचा, रुग्णवाहिकांचा मोठा तुटवडा होता.त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना सरकारी रुग्णालयासह खाजगी हॉस्पीटलचे उबंरटे झिजवावे लागले होते. आता मात्र बेड रिकामे असून, उपचारसाठी दाखल होणारे रुग्णांची संख्या शुन्यावर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...