आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Zilla Parishad's Account For The End Of March Has Not Been Done Yet, Chief Accounts And Finance Officer Of Zilla Parishad Has No Information | Marathi News

हिशेब नाही:जिल्हा परिषदेचा मार्चअखेरचा हिशेब अद्याप झालाच नाही, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे माहीतीच नाही

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्चअखेर प्रशासकीय कामे उरकण्याची धावपळ गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत सुरू आहे. ३१ मार्च उलटल्यानंतरही किती शासकीय निधी खर्च झाला व किती परत गेला याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे नसल्याचे, समोर आले आहे.

जिल्हा परिषदेवर नुकतीच प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगारे यांनी २१ मार्चपासून कामाला सुरूवात केली. त्यांनी मार्चअखेर खर्च होणाऱ्या निधीचा तालुकानिहाय आढावा घेऊन निधी अखर्चित राहणार नाहीत, यासाठी सुचना दिल्या होत्या.

३१ मार्चअखेर किती निधी खर्च झाला व किती अखर्चीत आहे, किती परत गेला याची माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनंजय आंधळे यांना विचारली असता, त्यांनी सध्यातरी सांगता येणार नाही. शासनाने काही दिवस मुदतवाढ दिल्याचे त्यांनी सांगितले. ही मुदतवाढ किती दिवसांची आहे, याबाबत विचारणा केली असता आंधळे यांनी, ते देखील सांगता येणार नाही, तुम्हाला सोमवारनंतर सांगतो, असे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...