आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावन्य प्राण्यांच्या त्रासामुळे सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील शेतकरी संकटात सापडला असून नुकसान भरपाईपासून वंचित आहे. त्यामुळे वनपाल, कृषी सहायक व तलाठ्यांनी तत्काळ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वरिष्ठांना सादर करावे. तसेच वन विभागाने त्यांच्याकडून देण्यात येणारी १ ते २५ हजारापर्यंतची नुकसान भरपाई तात्काळ देऊ करावी अशा, सूचना माजी मंत्री, आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठकीत दिल्या. आ. डॉ. शिंगणे अॅक्शन मोडवर आल्याने शेतकऱ्यांना आता वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
वन्य प्राण्यांच्या हैदोसावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात डॉ. शिंगणे यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. देऊळगाव राजा, सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतातील पिकांचे रोहींनी नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन यावर तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत अशा सूचना डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिल्या.
तसेच रोह्यांची प्रजनन क्षमता जास्त असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांची नसबंदी करा, वनक्षेत्राला कुंपण करा, असे निर्देश त्यांनी दिले. रोही तसेच वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचा पिक विम्यात समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉ. शिंगणे यांनी उपस्थितांना दिली. या बैठकीला उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.