आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:10 हजार 998 शेतकऱ्यांना सहा हजार हेक्टरची भरपाई मिळणार

बुलडाणा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेली अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे झालेले नुकसान व खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय ८ सप्टेंबर रोजी शासनाने काढला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील १० हजार ९९८ शेतकऱ्यांना ६००९ .६८ हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीसाठी ८२३ कोटी ८३ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. गणेशोत्सव विसर्जनाच्या आदल्या दिवशी हा मदतीचा निर्णय काढल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला यंदा गणपती बाप्पा धावून आला आहे. तसेच वाढीव हेक्टर व दुपटीच्या दराने ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

जिल्ह्यात १० हजार ८७९ इतक्या शेतकऱ्यांचे ५९९९.३९ हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यासाठी मदत ८११ कोटी ४३ लाख रुपये जिल्ह्याला मंजूर झालेले आहे. आश्वासित सिंचनाखालील १०१ शेतकऱ्यांचे ३५.२५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यासाठी ९.५४ कोटींची मदत मंजूर झाली आहे. बहु वार्षिक पिकाखालील १८ शेतकऱ्यांचे ७.९४ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले असून त्यासाठी दोन कोटी ९६ लाख रुपये मदत मंजूर झाली आहे. शेतजमीन खरडून गेलेल्या ३.३५ हेक्टर क्षेत्रासाठी प्रति ३७ हजार ५०० रुपये प्रमाणे एक कोटी २६ लाख रुपये मिळणार आहेत. शेतजमिनीवर तीन इंचांपेक्षा अधिक पाऊस पडलेल्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. परंतु, बुलडाणा जिल्ह्यात असा पाऊस पडला नसल्याची नोंद आहे.

जून, जुलै महिन्यात झालेले नुकसान असे
जून महिन्यात १०६ बागायतदार शेतकऱ्यांचे ३३.४४ हेक्टरचे तर फळ पिकांचे ७.९४ हेक्टरचे नुकसान झाले होते. या करता तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणे बागायतीसाठी चार कोटी ६१ लाख व फळ पिकांसाठी अठरा हजार रुपये हेक्टर प्रमाणे एक कोटी ४३ लाख रुपये अपेक्षित निधीची आवश्यकता होती. याकरता वाढीव दर घोषित झाल्यानंतर दोन्ही नुकसानीसाठी ११ कोटी ८९ लाखांची मागणी नव्याने करण्यात आली होती. जुलै महिन्यात १० हजार ७४० शेतकऱ्यांच्या ५८११.७९ हेक्टर जिरायत क्षेत्रावरील, ३५.३५ हेक्टर बागायत तर ७.९४ हेक्टर फळ पिकांचे नुकसान झाले होते. अशा एकूण ५८११.७९ हेक्टर क्षेत्राकरता ७९० कोटी ९२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात ११८६ शेतकऱ्यांची २३९.५२ हेक्टर जिरायती शेती तर ८.४० हेक्टर शेती बागायती होती. या नुकसानीपोटी ३४.८४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

अशी आहे मदत
जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी सहा हजार ८०० रुपये प्रति हेक्टर मदत दोन हेक्टरसाठी प्रचलित दर होते. वाढीव दर १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टर मर्यादित होता. वाढीव दार २७ हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आहे. बहु वार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी १८००० रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत होता. वाढीव दर ३६ हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आहे.

बातम्या आणखी आहेत...