आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक कारवाई:103 क्विंटल तांदूळ पकडला; रेशनचा असल्याचा संशय

शेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव रोडवरील हॉटेल विघ्नहर्ता समोर असलेल्या गोडावूनवर शहर पोलिसांनी धाड टाकून १०३ क्विंटल तांदूळ पकडला. हा तांदूळ रेशनचा असल्याचा पोलिसांना संशय आहे. ही कारवाई ३० सप्टेंबरला रात्री ११ च्या सुमारास केली आहे. या धडक कारवाईमुळे रेशनच्या मालाचा काळाबाजार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.हॉटेल विघ्नहर्ता समोर असलेल्या गोडावूनमध्ये रेशनचा तांदूळ साठवून ठेवल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.

या माहितीवरून पोलिस पथकाने ३० सप्टेंबरला रात्री ११ वाजता छापा मारला असता एका गोडाउनमध्ये १०३ क्विंटल तांदूळ आढळून आला. हा तांदूळ पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त केलेला तांदूळ रेशनचा आहे, की कसे या बाबत अहवाल मागितला आहे. तहसीलदारांचा अहवाल आल्यानंतर या तांदळाबाबत योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वी तांदूळ घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले होते. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तर शुक्रवारी रात्री १०३ क्विंटल तांदूळ सापडल्याने रेशन माफियांची पाळेमुळे चांगलीच घट्ट झाल्याचे दिसते.

बातम्या आणखी आहेत...