आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी प्रतिक्षेतच:जिल्ह्यातील पीक विमा कंपनीकडून नुकसानीपोटी 103.73 कोटी मंजूर

बुलडाणा5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीला दिली होती. एकुण दोन लाख ३५ हजार ७५१ दावे प्राप्त झाले होते. त्यानुसार पीक विमा कंपनीने सर्वेक्षण केलेल्या एक लाख ५६ हजार ०५६ मिळालेल्या सूचनांनुसार १०३.७३ कोटी रुपयांची रक्कम विमा कंपनीकडून निश्चित केली आहे. मात्र नोव्हेंबर महिना संपत असताना ११ हजार २६२ शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या सूचनांचे सर्वेक्षण अजूनही सुरुच आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील तीन लाख ५६ हजार २२० पीक विमा अर्ज दोन लाख ८१ हजार ७०९.९६ हेक्टर क्षेत्राकरता २०२२-२३ करता काढला होता. २२२ कोटी ५८ लाख ५१ हजार ९४३ रुपये याकरता शेतकरी, राज्य व केंद्र शासनाकडून पीक विम्याचे भरण्यात आले होते. नुकसानीची माहिती दोन लाख ३५ हजार ७५१ शेतकऱ्यांनी दिली होती.

पीक विम्याची नुकसान भरपाई रब्बीतही नाही
सध्या पीक विम्याबाबत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. तीच भूमिका शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांनीही घेतली आहे. शिवसेनाही याबाबत बोलत आहे. राष्ट्रवादीही पीक विम्यासाठी आपली भूमिका वठवत आहे. तर रब्बीची पेरणीची वेळ आल्यानंतरही विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकरीही आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे सोयाबीन व कापसाला भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात आंदोलन करत आहे. अशी परिस्थिती असतानाही पीक विमा कंपनी मात्र जागृत होत नसून पीक विमा मंजुरी व विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.

४५ हजार ८४१ शेतकऱ्यांची भरपाई अनिश्चित
कृषी आयुक्त यांच्या पत्रानुसार अद्याप ४५ हजार ८४१ शेतकऱ्यांच्या सूचनांची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणे निश्चित होणे बाकी आहे. भारतीय कृषी विमा कंपनीशी कृषी विभागाने केलेल्या चर्चेनुसार चार ते पाच दिवस निश्चित झालेली नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात कंपनीमार्फत जमा करण्यात येणार आहे. विमा कंपनीच्या तरतुदीनुसार ही रक्कम दिल्या जाणार असल्याने ती पुरेशी मिळेल की नाही. याबाबत मात्र शंका उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...