आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्लड ऑनकॉल ही याेजना २०१४ या वर्षी शासनाकडून सुरु करण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन केल्या जात होते. परंतु मागील मार्च २०२२ पासून ब्लड ऑनकॉल ही योजना शासनाने बंद केली आहे. त्यामुळे येथील कंत्राटी पध्दतीने काम करणारे कर्मचारी कमी करण्यात आले आहे. यामुळे रक्त संकलनावर देखील परिणाम झालेला आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील वर्षी ३ हजार ९०५ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. तर खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात ३ हजार २४० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे, असे एकूण जिल्हा व उपजिल्हा सामान्य रुग्णालयात ७ हजार १४५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन रुग्णालयाचे प्राण वाचवले आहेत. यामध्ये रक्तदात्यांनी जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यामाध्यमातून येथील सामान्य रुग्णालयात रक्तदान केले आहे. तर अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे घेवून रक्तसंकलन करण्यात आले आहे.
नवीन वर्षात ३९० रक्तपिशव्याचे संकलन खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात २१४ बॅगचे संकलन खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात जानेवारी २०२३ या महिन्यात करण्यात आले आहे.यामध्ये रुग्णालयात ५१ बॅगचे संकलन तर ७ रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १६३ बॅगचे संकलन असे एकूण २१४ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. तर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात १७६ रक्त पिशव्यांचे संकलन केले.
हे कर्मचारी बघतात जिल्ह्यातील रक्त संकलनाचे काम बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर राऊत हे काम बघत आहेत. त्यांच्या समवेत टेक्निशियन सुपरवायझर विनोद झगरे, टेक्निशियन गौरव कुळकर्णी हे काम बघत आहेत. तर खामगाव सामान्य रुग्णालयात रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.प्रणाली देशमुख, वरीष्ठ रक्तपेढी वैज्ञानिक सुरेंद्र छाजेड हे काम बघत आहेत.
स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाने रक्तदान करावेप्रत्येक व्यक्तीने आपल्या किंवालग्नाच्या वाढदिवशी रक्तदान करावे,जिल्हयातील सामाजिक संघटना,संस्था व सामाजिक कार्य करणाऱ्यांनीरक्तदान शिबिराचे आयोजन करावे.या शिबिराच्या माध्यमातून संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांकरिता दिले जाते. - डॉ.ज्ञानेश्वर राऊत, रक्त संक्रमण अधिकारी,जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा. कंत्राटी कर्मचारी केले कमी; जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा नवीन वर्षात असे झाले रक्त पिशव्यांचे संकलन जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत ३ हजार ९०५ रक्त पिशव्यांचे तर खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात मागील वर्षी ३ हजार २४० संकलन करण्यात आले आहे. नवीन वर्षात जानेवारी २०२३, १७६ रक्त पिशव्यांचे, बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तर खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात २१४ रक्त पिशव्यांचे संकलन केले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.