आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी मांडला होता प्रस्ताव:जनुना येथे ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरसाठी‎ 10 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर‎

खामगाव‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा मतदारसंघात बुलडाणा प्रादेशीक‎ वन विभागांतर्गत येत असलेल्या खामगाव‎ वनपरिक्षेत्रात ज्ञानगंगा अभयारण्य असून या‎ जंगलात बिबट, अस्वल, काळविट,‎ निलगाय, साळिंदर यासह अनेक प्रकारचे‎ संरक्षित पक्षी व विविध वन्यप्राणी आहेत.‎ अनेक वेळा हे प्राणी जखमी किंवा आजारी‎ असतात. या प्राण्यांना योग्य उपचार न‎ मिळाल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागतात.‎ यासाठी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी‎ खामगाव येथे नवीन ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर‎ स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर‎ करण्याची सुचना केली होती. त्याचा‎ पाठपुरावा करुन हे सेंटर तालुक्यातील जनुना‎ येथे मंजूर करण्यात आले आहे.‎

सद्यस्थ‍ितीत केवळ नागपूर व पुणे येथेच‎ वन्यजीवांना उपचारार्थ न्यावे लागते. त्यामुळे‎ ज्ञानगंगा, अंबाबरवा व लोणार अभयारण्यात‎ जखमी अथवा आजारी वन्यजीव असल्यास‎ त्यांना उपचारार्थ नागपूर अथवा पुणे येथे‎ नेण्यास तीनशे ते पाचशे कि.मी. चा प्रवास‎ करावा लागतो. त्यामुळे वन्य जीवांच्या‎ जिवितास हानी पोहचते.‎ या सर्व अभयारण्यात अस्वलांची मोठी संख्या‎ आहे.

या अस्वलांचे संरक्षणासाठी व‎ उपचारार्थ विशेष सेंटर स्थापन करण्याचा‎ प्रस्ताव सहाय्यक वन संरक्षक बुलडाणा यांनी‎ डिसेंबर २०२२ प्रस्ताव सादर केला होता. अशा‎ प्रकारचे ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर कोलकता‎ पश्चीम बंगाल येथे आहे.‎ आता अशाच प्रकारचे अद्यावत असे ट्रान्झिट‎ ट्रिटमेंट सेंटर जनुना येथे वनपरिक्षेत्रात‎ करण्यात येणार आहे. यासाठी १० कोटी ५०‎ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.‎ त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे‎ वातावरण पसरले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...