आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथून खामगावकडे जाणाऱ्या बसचे स्टेअरिंग जानेफळजवळील पाथर्डी घाटात जाम झाल्यामुळे अपघात झाला. शनिवार, ४ फेब्रुवारीला दुपारी १२.३० वाजता झालेल्या या अपघातात चालक-वाहकासह १२ प्रवासी जखमी झाले आहेत. खामगाव आगाराची बस (क्रमांक एमएच ४० एन ८२८९) दुपारी मेहकरवरून खामगावकडे जात होती. जानेफळनंतर असलेला पाथर्डी घाट संपत आल्यानंतर बसचे स्टेअरिंग अचानक जाम झाले.
चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडक दिली. या अपघातात चालक-वाहकासह १२ प्रवासी जखमी झाले. तसेच बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात चालक विवेक आश्रूजी काळे (वय ४८, रा. खामगाव) यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्यांना दुखापतही झाली आहे. वाहक बाळू भाऊजी गव्हाळे (वय ५४, रा. खामगाव) यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच रजियाबी शे. वजीर (वय ५५, रा. शेगाव), अश्विनी कैलास राठोड (वय १६, पाथर्डी), पारखेड येथील हरिभाऊ त्र्यंबक सोळंके ( ७५), अनुसया हरिभाऊ सोळंके ( ६५ )
अपघातग्रस्त बस व प्रवासी.
आगारप्रमुखांची अनास्था अपघातानंतर चालक-वाहकासह जखमी प्रवाशांवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अपघाताच्या चार तासानंतरही मेहकर आगारप्रमुख किंवा इतर जबाबदार अधिकाऱ्याने त्यांची भेट घेतली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.