आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद मेळावा:चिखलीसाठी 128 कोटीची पाणी योजना प्रस्तावित ; आ. श्वेता महाले यांची ग्वाही

चिखली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखलीवासीयांना पंधरा-पंधरा दिवस पाणी पुरवठा होत नाही. धरणात पाणी आहे पण, पाणी पुरवठा योजना जुनी असल्याने आणि वितरण व्यवस्था व्यवस्थित नसल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यासाठी चिखली शहराला सुरळीत, मुबलक आणि दररोज पाणीपुरवठा करता येईल अशी १२८ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना शासन दरबारी सादर केलेली असून या योजनेला लवकरच मान्यता मिळणार आहे. त्यामुळे शहर वासियांची कायमस्वरुपी पाणीटंचाईतून मुक्तता करणार असल्याची ग्वाही आमदार श्वेता महाले यांनी दिली.

चिखली विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे शक्ती, बूथ प्रमुखांच्या संवाद मेळावा शुक्रवारी मौनीबाबा मठात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आ. श्वेता महाले बोलत होत्या. यावेळी मंचावर रामकृष्ण शेटे, प्रेमराज भाला, संजय चेके पाटील, सुधाकर काळे, सुरेंद्र पांडे, अॅड. मंगेश व्यवहारे, देविदास पाटील जाधव, श्रीरंग वेन्डोले, राजाभाऊ खरात, रामदास देव्हडे, डॉ. कुष्णकुमार सपकाळ, अनिसभाई, हरीकिशन वाधवानी, सुनीता भालेराव, अशोक अग्रवाल, द्वारका भोसले, सुनंदा शिनगारे, संतोष काळे, आशाताई घाटगे, अंबादास घाटगे, सुहास शेटे यांच्यासह नगरसेवक, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती बूथ प्रमुख उपस्थित होते. यावेळी आ. श्वेता महाले यांनी चिखली विधानसभा मतदार संघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे असे आवाहनही कार्यकर्त्यांना केले.

हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी ६६ कोटी रुपयांचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली चिखली नगर पालिका हद्दीवाढीस मान्यता मिळाल्याने चिखली शहराला लागून असलेला भाग चिखली नगर पालिका हद्दीत समाविष्ट झालेला आहे. या भागात कधीही विकास न झाल्याने हद्द वाढ झालेल्या भागात विकासाचा प्रचंड अनुशेष निर्माण झालेला आहे. यासाठी हद्द वाढ भागातील मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी ६६ कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला आहे.

त्या प्रस्तावास सुद्धा लवकरच मान्यता घेवून हद्द वाढ झालेल्या भागात लवकरच विकासाची कामे सुरू झाल्याचे दिसणार आहे. चिखली विधानसभा मतदार संघातील विकास कामांसाठी किमान एक हजार कोटी रुपयांचे टार्गेट ठेवलेले असल्याने चिखली शहराचे रूप बसलेले दिसेल, असे भाजप शहराध्यक्ष पंडित देशमुख यांनी सांगितले. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस शेख बुढन यांनी माझ्यासारख्या एका अल्पसंख्य माणसाला भाजपने मोठे केले हे माझे भाग्य असल्याचे सांगितले. यावेळी व्हॉइस ऑफ इंडियाच्या राज्य संघटक पदी नियुक्तीबद्दल सुधीर चेके पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...