आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंदखेडराजा येथे परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका व्हायरल:जीपीएस, व्हिडिओ शूटिंगने निगराणी तरी 12 वी गणिताचा पेपर फुटलाच

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॉपीमुक्तीचीच ‘शाळा’

दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभाग व बोर्डाकडून राबवण्यात येणाऱ्या सर्व उपायांची सुरक्षा भेदून पेपरफुटीचे रॅकेट सक्रिय झाले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव व साखरखेर्डा केंद्रांवरून शुक्रवारी पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधीच बारावी गणिताचा पेपर व्हायरल झाला. या दोन्ही केंद्रांवरील अधिकारी, कस्टोडियनचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत. एकाच केंद्रावर हा प्रकार झाल्याने फेरपरीक्षा घेणार नसल्याचे बोर्डाच्या सचिव अनुराधा ओक म्हणाल्या.

विधानसभेत विरोधकांनी विचारला जाब, सरकार म्हणाले... चौकशी करू
इतकी खबरदारी तरी पेपर फुटतोच कसा?

{पेपरफुटी टाळण्यासाठी १० मिनिटे आधी पेपर देण्याची पद्धत या वर्षीपासून बंद झाली. त्याएेवजी १० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला.
{ प्रश्नपत्रिका ज्या वाहनाने परीक्षा केंद्रावर पाठवल्या जातात त्यावर ‘जीपीएस’द्वारे लक्ष ठेवले जाते.
{असिस्टंट कस्टाेडियनमार्फत केंद्र चालकाकडे पेपर सोपवताना त्याचे व्हिडिअाे शूटिंग केले जाते. इतकी
खबरदारी घेतली तरी पेपर कसा फुटला याची चौकशी करू, असे बोर्ड अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले.
{जळगाव जिल्ह्यातही बारावीचा इंग्रजी पेपर व्हायरल झाला होता.
{परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथेही इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांना उत्तरे लिहून देणाऱ्या पाच शिक्षकांसह उपकेंद्र संचालकास अटक झाली होती.

शुक्रवारी पथकाला ५ जिल्ह्यांत सापडले ८ काॅपीबहाद्दर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६, जालना १, हिंगाेली १, बीड व परभणीत एकही काॅपी सापडली नाही.

हा अभ्यासू विद्यार्थ्यांवर अन्याय : अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत जाब विचारला. ‘पेपरफुटी वारंवार घडत आहे, अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. यामागे एखादे रॅकेट आहे का याची सखोल चौकशी करावी, बोर्डावरही कारवाई करावी,’ अशी मागणी त्यांनी केली. त्यावर याप्रकरणी चौकशी करून लवकरच सभागृहात निवेदन केले जाईल, असे उत्तर मंत्री राधाकृष्ण विखेंनी दिले.

बातम्या आणखी आहेत...