आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य उत्पादन शुल्काची कारवाई:बनावट दारुसह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त ; एका आरोपीस अटक

खामगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट दारू कारमधून विक्रीसाठी नेत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा लावून पकडली. यावेळी कारमधील एका आरोपीस अटक करण्यात आली असून एक आरोपी मात्र फरार झाला आहे. दरम्यान बनावट दारू व कारसह १४ लाख ३२ हजार ११० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातून बनावट दारू वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यावरून अमरावती विभागाचे उपआयुक्त चिंचाळकर, बुलडाणा विभागाचे अधिक्षक भाग्यश्री जाधव यांचे मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर. के. फुसे यांच्या पथकाने मेहकर ते डोणगाव रोडवर सापळा रचला. याठिकाणी महिंद्रा कंपनीची चार चाकी क्रमांक एमएच- ४६ डब्ल्यु ५१६२ या वाहनाने आरोपों गुरमिंदसिंग अरर्मिदसिंग बगा रा. अमरावती यास अवैधरित्या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली मध्यप्रदेश निर्मित बॉम्बे व्हिस्की तसेच बनावट विदेश माया ब्रॅन्डच्या विदेशी दारूची वाहतुक करीत असताना पकडले.

यावेळी दीपक रंगराव देगेकार रा. अमरावती हा फरार झाला. अटक आरोपी बगा याचे जवळून एकूण ४२० बॉम्बे व्हिस्की या ब्रॅडच्या ७०० मिलीच्या सिलबंद बाटल्या तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण १४ लाख ३२ हजार ११० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध मदाका १९४९ चे कलम ६५ एडीएफ ८०, ८१, ८३, ९०, १०८ भादवी ३२८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई दुय्यम निरीक्षक आर. के. फुसे, प्रभारी निरीक्षक नरेंद्र मावळे, चिखली सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी.आर. गावंडे, गजानन पहाडे, संतोष ऐडसकर, अमोल सुमरे, प्रदिप देशमुख, गणेश मोरे, संजीव जाधव यांनी केली. पुढील तपास आर. के. फुसे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...