आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:मलकापूर पांग्रा परिसरात 14 हजारांची दारू जप्त; चाैघांवर गुन्हा दाखल

मलकापूर पांग्रा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज, दि. १७ डिसेंबर रोजी धाड टाकून चौघांवर कारवाई केली. त्यांंच्याकडून दारूचा १४ हजार ७८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

चिखली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज मलकापूर पांग्रा आणि तळेगाव परिसरातील हॉटेल निसर्ग, हॉटेल प्रतीक, एक टपरी आणि फुल्लर यांच्या ढाब्यावर धाडी टाकल्या. यावेळी ढाब्यांवर देशी आणि विदेशी दारूच्या अवैधरीत्या ठेवलेल्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जी. आर. गावंडे, मेहकरचे निरीक्षक एस. डी. चव्हाण आणि दुय्यम निरीक्षकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...