आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिरंगाई:जिल्ह्यातील 14,162 शेतकरी पीक विमा भरपाईच्या प्रतीक्षेत ; 7500 शेतकऱ्यांचेच पंचनामे

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडूनही नुकसान भरपाई मिळाली नाही, तर ७२ तासांच्या आत या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देणाऱ्या १४ हजार १६२ शेतकऱ्यांना विम्याच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. मात्र विमा कंपनीने यापैकी केवळ सात हजार ५४१ शेतकऱ्यांचेच पंचनामे केले आहे. नुकसान होऊन महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटूनही या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. जिल्ह्यातील तीन लाख ५६ हजार २२० शेतकऱ्यांनी दोन लाख ८१ हजार ७०९.९६ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. सात लाख ३५,५२१ हेक्टरपैकी काढलेल्या हेक्टरचा हा विमा निम्म्या क्षेत्राचाही नसल्याने शेतकऱ्यांचा विमा कंपनीवरील विश्वास उडाला आहे. या विम्यापोटी तीन लाख ५६ हजार २२० शेतकऱ्यांनी ३३ कोटी १६ लाख ९४१८६ रुपये भरले. तर राज्य व केंद्र सरकारने ९४ कोटी ७० लाख ७८ हजार ८६८ रुपये सारखेच भरलेत. एकुण विम्यापोटी २२ कोटी ५८ लाख ५१ हजार ९४३ रुपये विमा कंपनीला मिळाले. असे असतानाही १४ हजार १६२ शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाले नाही. अजूनही पंचनामेच सुरू असून शेतकऱ्यांचा कोणी वाली नसल्याचे दिसत आहे. एनसीपीमार्फत १३३७०, टोल फ्री फोन मार्फत १५४ व ई मेलद्वारे ६३८ शेतकऱ्यांनी आपल्या नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनीकडे केल्या आहेत.

कृषी विभागाचा कंपनीकडे पाठपुरावा
विम्यासाठी शेतीचे पंचनामे स्वतः कंपनीच करत असल्याने ते फक्त अहवाल पुरवण्याचे काम करत आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सध्या पंचनामे केले आहेत. अजून पंचनामे ते करत असल्याने शेतकऱ्यांना पीक विम्यापासून मिळणारी नुकसान भरपाई कंपनीने द्यावी. यासाठी कृषी विभाग पाठपुरावा करत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

तक्रार केली पण भरपाई अद्यापही मिळाली नाही
साखरखेर्डा येथील अमोल शंकर गवई यांचे अतिवृष्टीमुळे गट नंबर ८२ मधील शेतात पिकाचे नुकसान झाले होते. त्यांनी या बाबत ७२ तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे तक्रार केली होती. परंतु, अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. तर शिंदी येथील अशोक आत्माराम खरात म्हणाले, सध्या सणासुदीचे दिवस आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना पीक विमा कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी.

बातम्या आणखी आहेत...