आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत ६०० महिला स्वयं सहाय्यता समूहांना ९ कोटी रुपये बँक कर्ज व उमेद अभियानातील निधी २००० समूहांना प्रत्येकी १५,००० रुपये प्रमाणे ३ कोटी रुपये, ५०० समूहांना प्रत्येकी ६० हजार रुपये प्रमाणे ३ कोटी रुपये, ग्रामसंघांना ७० लाख व्यवस्थापन निधी, पीएमएफएम आदी योजनेंतर्गत २५ लाख रुपये असे एकूण १५.९५ कोटी रुपयांचे वाटप खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. महिला दिना निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रतापराव जाधव हे होते.
मेळाव्याला अनुसरून महिलांना संबोधित करताना खासदार जाधव यांनी उमेद अभियानातील महिलांना महिला स्वयं सहाय्यता समूह म्हणजे काय? याचे महत्व पटवून सांगितले. कार्यक्रमात पाच उत्कृष्ट उद्योजक महिलांच्या यशोगाथा संबंधित महिलांकडून ऐकण्यात आल्या. तसेच निधी वाटपावेळी बँकेचे कर्ज, अभियानातून मिळणारा फिरता निधी, व्यवस्थापन निधी, समुदाय गुंतवणूक निधी याप्रमाणे पात्र महिलांना निधी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ, एस. बी. आयचे विभागीय अधिकारी भरत शेळके, जिल्हा अभियान व्यवस्थापक नितीन मेश्राम, गटविकास अधिकारी बुलडाणा श्रीमती पवार, गटविकास अधिकारी नांदुरा समाधान वाघ, गटविकास अधिकारी खामगाव चंदनसिंग राजपूत, गटविकास अधिकारी शेगाव सतीश देशमुख, गटविकास अधिकारी मलकापूर उद्धव होळकर, गटविकास अधिकारी लोणार उमेश देशमुख, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे तसेच उमेद अभियानातील जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच समुदाय संसाधन व्यक्ती (महिला कॅडर) व समूहातील महिला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा मुंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा व्यवस्थापक विक्रांत जाधव यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.