आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:पक्ष्यांसाठी बांधली 15 मातीची घरटी

बुलडाणा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीत फटाक्यांच्या प्रदूषणामुळे शहरातून ज्ञानगंगा अभयारण्यात स्थलांतरीत झालेल्या पक्ष्यांसाठी घरट्यांची व्यवस्था वन्यजीव सोयरेंनी केली. मातीची १५ घरटी त्यांनी झाडाला बांधून पक्ष्यांना निवारा करुन दिला. यामध्ये काही पक्षांनी निवारा घेतल्याचे वन्यजीव सोयरे यांनी सांगितले.ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्य शासन ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. तसेच नोव्हेंबर हा महिना पक्ष्यांच्या स्थलांतराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

या काळात दिवाळी असल्याने फटाक्यांच्या ध्वनी प्रदूषणासह वायू प्रदूषणही होते. आवाजामुळे शहरातून आणि गावातून पक्षी ज्ञानगंगा अभयारण्यात स्थलांतरीत झाले आहेत. या पक्ष्यांचा विचार करून वन्यजीव सोयरे बुलडाणा यांनी मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी ज्ञानगंगा अभयारण्यातील बोरखेड रस्त्याकडील तोफखाना बिटमधील सोलार मचानजवळ पक्षांसाठी मातीची घरटे लावली.ही कृत्रिम घरटी नैसर्गिक वाटावीत म्हणून झाडांच्या पानांचा वापर करून ती बांधण्यात आली आहेत.

दरवर्षी घरटे लावण्यात येतील
ज्ञानगंगा अभयारण्यात वेगवेगळ्या ठिकाणा वरुन पक्ष्यांचे आगमन झाले आहे. सर्व पक्ष्यांचे घरटे निर्माण व्हावे म्हणून एक छोटासा उपक्रम १५ मातीचे घरटे बांधून पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. या मोहिमेला सोयरे, प्रकाश डब्बे, शाम राजपूत, प्रशांत राऊत, नितीन श्रीवास्तव यांनी श्रमदान केले. दर वर्षी पक्षी सप्ताह निमित्त वन्यजीव सोयरे, बुलडाण्याकडून कृत्रिम घरटी लावण्यात येईल. नितीन प्रतापसिंह श्रीवास्तव, बुलडाणा

बातम्या आणखी आहेत...