आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील १७ सहाय्यक पोलिस निरीक्षक तर २६ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बुलडाणा पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक अभिजीत अहिरराव यांच्या बदलीस मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज शाखेतील सुनील सोळंके यांची बदली पोलिस स्टेशन सायबर, आर्थिक गुन्हे शाखेचे अशोक जायभाये यांची बदली मेहकर, दुर्गेश राजपूत सायबर शाखा यांची बदली बुलडाणा ग्रामीण, बुलडाण्याचे सदानंद सोनकांबळे यांची बिबी पोलिस स्टेशन, बुलडाण्याचे ब्रिजलालसिंग ठाकूर हे मलकापूर नियंत्रण कक्षात वाचक विभागाचे नंदकिशोर काळे हे साखरखेर्डा, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्षाच्या सविता मोरे पाटील या एफआरओ जिल्हा विशेष शाखेत, तर मेहकर पोलिस स्टेशनचे नंदकुमार अहिरे यांची बदली बुलडाणा अर्ज शाखेत करण्यात आली आहे.
उपनिरीक्षक देव तायडे हे बुलडाण्यात आले. चिखलीचे सचिन चौहान बुलडाणा शहर पोलिस स्टेशन, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्षातील रिना कोरडे यांच्या बदलीला मुदतवाढ देण्यात आली. बाेराखेडी पोलिस स्टेशनचे अनिल भुसारी जिल्हा विशेष शाखेत आले. मलकापूरचे संजय ठाकरे महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्षात, लोणारचे उपनिरीक्षक सुरज काळे आणि देऊळगावचे किरण खाडे यांच्या बदलीला मुदतवाढ मिळाली असून पोलिस कल्याण शाखेतील मुकुंद डोके हे वाचक शाखेत आले आहेत.
बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेतील श्रीकांत जिंदमवार वाहतूक नियंत्रण शाखेत तर जिल्हा विशेष शाखेतील विजय हुडेकर कल्याण शाखेत आले. बुलडाणा नियंत्रण कक्षातील स्वप्निल रणखांदे नांदुरा तर देऊळगावराजा वाचक कक्षातील मोहन गीते बुलडाणा नियंत्रण कक्षात तसेच साखरखेर्डाचे पोलिस उपनिरीक्षक सचिन कानडे स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा येथे आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.