आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर स्थिती:आठ महिन्यांत 172 शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला, 25% तरुण

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांसाठी विविध योजना शासन राबवत असून, नुकसान झाल्यास विम्याचाही आधार देण्याचा प्रयत्न होत आहे. असे असतानाही, गेल्या ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब शासकीय अहवालात नमुद करण्यात आली आहे. तर गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यात १७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासनाने घेतली आहे. यातील ३४ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरील समितीने मदतीसाठी पात्र ठरवले असून, त्यापैकी २५ कुटुंबीयांना आतापर्यंत मदत देण्यात आली आहे. आत्महत्या करणारे शेतकरी हे २३ ते ६० या वयोगटातील असून, यात तरुण शेतकऱ्यांचे प्रमाण २५ टक्के असून, जिल्ह्यासाठी सुन्न करणारी ही स्थिती आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, कमी उत्पान, मालाला भाव कमी मिळणे तसेच अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान ही आत्महत्या केलेल्या तरुण व अन्य शेतकऱ्यांची प्रमुख कारणे असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे.

या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे स्तरावरील समितीने ३४ आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना मदतीसाठी पात्र ठरवले, त्यापैकी २५ कुटुंबीयांना मदत दिली आहे. आत्महत्या करणारे शेतकरी हे २३ ते ६० या वयोगटातील आहेत. यात तरुण शेतकऱ्यांचे प्रमाण २५ टक्के आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, कमी उत्पान, मालाला भाव कमी मिळणे तसेच अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अशी आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्यांची कारणे असून, जिल्ह्यासाठी ही सुन्न करणारी स्थिती असल्याचे स्पष्ट होत आहे.

शासकीय नोंदवहीत शेतकरी आत्महत्येची कारणे विषद नसतात. ती फक्त गळफास लाऊन, विषारी औषध प्रशासन करुन , विहिरीत उडी मारुन आत्महत्या करण्यात आल्याचे नमुद करण्यात येते.बहुतांश आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे होतात. वेळेवर बँकांचे कर्ज न भरल्याने हप्ते थकतात व बँका पैशाचा तगादा लावतात. या व्यतिरिक्त सावकारी कर्जामुळेही आत्महत्या होतात. शासनाने बरेच प्रयत्न केले पण आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस असा उपाय सापडत नाही. मुख्यमंत्री बनल्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही शेतकरी आत्महत्या करणार नाही. अशा योजनांची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही आत्महत्या झाल्या आहेत. जुन महिन्यातही जिल्हयातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचीही मदत अजुन मिळाली नाही. अशा विलंबाने मदत मिळणे व सततची नापिकी होणे या त्रासाला कंटाळूनही शेतकरी आत्महत्या करत आहेत. उत्पादन झाले तर मालाला भाव न मिळणे. ही सुध्दा एक समस्या शेतकऱ्यांभोवती असल्याने जेव्हढा खर्च पिक येण्यासाठी लावला ती मुद्दलही निघत नाही.

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने पंधरा हजार द्यावेत
जिल्ह्यात अस्मानी व सुलतानी संकट वाढत आहे. शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. निसर्ग कोपला असतांना फक्त घोषणा केल्या जातात. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारनी ताबडतोब पंधरा हजार दिले असते, तर काही फरक पडला असता. कृषी मंत्री पाच दिवसांत खात्यात पैसे जमा होतील असे सांगतात, याला काही अर्थ नाही. शिंदे व फडणवीसांनी चांगली पीक विमा योजना राबवावी. आजची ‘फसल विमा योजना’ शंभर गावांची आहे, ती ग्राम निहाय करावी. शंभर टक्के शासनाने पिक विमा दयावी. तीन हेक्टरची नुकसान भरपाई प्रामाणिकपणे द्यावी व जुने कर्ज माफ करावे. शेतकऱ्यांचे कमाल नुकसान झाल असेल तर रोजगार हमीप्रमाणे मदत करावी.
- विजय जावंधिया, शेतकरी नेते

बातम्या आणखी आहेत...