आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदासीनता:वर्षभरात झाले 174 शेतकऱ्यांचे मृत्यू, 50 प्रकरणात दिली मदत ; अपघात विमा योजनेची 16 प्रस्ताव फेटाळले

बुलडाणा / लक्ष्मीकांत बगाडे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप-सेना युतीच्या काळात स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. यात मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या कुटुंबातील सदस्यांना या विमा योजनेंतर्गत लाभ देण्याची शासनाची भूमिका होती. बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची संख्या १७४ व जखमी झालेले पाच अशी १७९ प्रकरणांची नोंद योजनेअंतर्गत करण्यात आली. यातील ३९ प्रकरणे कंपनीच्या दलालांनी हाताळली. ४८ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली. २६ प्रकरणे सध्या प्रोसेसमध्ये आहेत, तर ५० कुटुंबांना मदत करण्यात आली व १६ प्रकरणे नाकारण्यात आली आहेत.

शेती व्यवसाय करताना अंगावर वीज पडणे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येते. परिणामी कुटुंबावर आर्थिक संकट येते. त्यामुळे या शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावा. या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबातील कोणताही १ सदस्य त्यामध्ये आई-वडील, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण २ जणांना या योजनेचा लाभ घेता येतो. जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या १७४ व जखमी झालेल्या ५ कुटुंबाची या योजनेअंतर्गत नोंद घेतली आहे.

वर्ष, सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले नॉमिनी : इंदुमती समाधान पऱ्हाड मेरा बु., स्वाती चांगदेव डुकरे भोगावती, ज्योती उत्तम गायकवाड केळवद, वंदना अशोक डोईफोडे नारायणखेड, शीतल सुदर्शन चित्ते खल्याळ गव्हाण निमगाव गुरु, कल्याणी गणेश गायकवाड खल्याळ गव्हाण, रंगनाथ झिने गिरोली बु, मंदा मधुकर दांदगे मंडपगाव, कलावती दत्तू नागरे पिंपळगाव उंडा, अंजू संदीप सुरवाडे बोरी, शकुंतला भास्कर शिरसाट येसापूर, निर्मला भानुदास काळे गोहेगाव, रजियाबी शेख शब्बीर पेनटाकळी, सुमन देविदास दाभाडे तिघ्रा, आत्माराम सुरळकर पळसोडा, ताईबाई रतन वानखेडे महाळुंगी, ज्ञानेश्वर सुरडकर पळसोडा, माणिकराव सोळंके लोणवडी, संतोष ढगे चिंचोली बु., वंदना प्रल्हाद नाडे सिंदखेडराजा, संजय आंधळे जागदरी, मगन लिहणार अंचली, श्रद्धा दिलीप शिंदे ताडशिवणी.

शेतकरी कुटुंबाला शासनाने मदत द्यावी
अनेक शेतकरी शेतात काम करत असताना साप चावल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने, वीज अंगावर पडल्याने व इतर कारणाने शेतात राबत असताना मृत पावतात. त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाकरिता किंवा कर्ता पुरुष गेल्याने मदतीचा हात शासन देत असला तरीही दिरंगाई व्हायला नको. त्वरित प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे.
- कैलास फाटे, शेतकरी नेते, खामगाव.

बातम्या आणखी आहेत...