आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चष्म्याचे वाटप:देऊळगावराजा येथील महाआरोग्य शिबिराचा १७५० रुग्णांनी घेतला लाभ; डॉ. रामप्रसाद शेळकेंच्या नेतृत्वात पार पडले रक्तदान शिबिर

बुलडाणा5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देऊळगावराजा येथे डॉ. रामप्रसाद शेळके यांच्या नेतृत्वात महाआरोग्य शिबिराचे आयोजन ३१ जुलै रोजी करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील १७५० रुग्णांनी लाभ घेतला. तर १७५ रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरवण्यात आले. यासह ७५ गरजूंना चष्म्याचे वाटप करण्यात आले.

श्री गणपती नेत्रालय जालना नेत्र तपासणी शिबिराचा शुभारंभ आयोजक डॉ. रामप्रसाद शेळके यांनी वीर जवानाच्या पत्नीच्या हस्ते केला. तर रक्तदान शिबिराचे उद्घाटन वीर जवानाच्या माता-पित्याच्या हस्ते केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. रामदास शिंदे व वीर पाल्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर देशासाठी शहीद झालेल्या जवानांचे वीर माता-पिता व वीर पत्नींचा साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. रामदास शिंदे ४० वर्षापासून अविरत सेवा देत असल्यामुळे तर कोरोना काळात ॲम्बुलन्सवर दिवसरात्र सेवा दिल्याबद्दल डॉ. अक्षय गुठे यांचा व शिवव्याख्याते उद्धव शेरे,पत्रकार सूरज गुप्ता यांच्यासह शिबिरासाठी उपस्थित ७५ डॉक्टर्स यांचा सत्कार करण्यात आला.

या शिबिरात सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळ पर्यंत रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी जेनरिक मेडिसिन स्टॉलचा पहिल्यांदाच प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी ठरला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. रामप्रसाद शेळके मित्र मंडळ फाउंडेशन व सैनिक मित्र फाउंडेशन यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...