आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाला सुरुवात:11  मंडळात चोवीस तासात 179  मि.मी. पाऊस

खामगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजांच्या कडकडाटासह, ढगांचा गडगडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह खामगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या ११ मंडळात ११ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण १७९.५ मि.मि तर १ ते ११ सप्टेंबर या कालावधीत एकूण ७७८.१३ मि.मि.पाऊस पडल्याची माहिती दिली आहे. १० सप्टेंबर रोजी सकाळपासूनच कधी उन्ह तर कधी सावली असा निसर्गाचा खेळ चालू होता. तर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आभाळात काळे ढग जमा झाले आणि सोसाट्याचा वारा, आभाळातील गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

या दरम्यान दिड ते दोन तास शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसास सुरुवात झाली. त्यानंतर थोडी विश्रांती घेत ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पुन्हा पाऊस बरसला. यादरम्यान महावितरणकडून विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. यंदाच्या पावसाळ्याला तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी नदी नाले एक होतील असा पाऊस बरसलेला नाही. पावसाळ्याच्या उर्वरीत दिवसात जर पाऊस झाला नाही तर शहर व गावांमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तालुक्यातील िंपळगावराजा, भालेगाव, पोरट, रोहणा आदी गावांमध्ये कपाशीचे वादळी वाऱ्याने नुकसान झाले.

बातम्या आणखी आहेत...