आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर:रुम्हणा गावाच्या विकासासाठी 18 लाख रुपयांचा निधी मंजूर ; राजेंद्र शिंगणेंचा ग्रामस्थांकडून सत्कार

सिंदखेडराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रुम्हणा येथील विविध विकासकामांसाठी माजी मंत्री, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. डॉ. शिंगणे यांचा सत्कार करून आभार मानले. रुम्हणा येथील रावसाहेब कायंदे यांच्याकडे सदिच्छा भेटीदरम्यान आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नवीन ग्रामपंचायत भवनासाठी १८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. या वेळी युवकांनी आ. डॉ. शिंगणे यांचा ग्रामस्थांच्या वतीने छोटेखानी सत्कार केला. मात्र, याच दरम्यान नितीन रावसाहेब कायंदे व इतर युवकांनी गावातील नवीन गावठाण परिसरात समाजोपयोगी कामासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली. दरम्यान आ. डॉ. शिंगणे यांनी ती मागणी तात्काळ मंजूर करत निधीचे पत्र युवकांना जागेवरच सुपूर्त केले.

याचबरोबर गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळच्या मोकळ्या जागेत समाज मंदिर उभारणीची मागणी देखील युवकांनी केली. ती मागणी येत्या काळात पूर्ण करण्याचे आश्वासन आ. डॉ. शिंगणे यांनी दिले. गावातील विकास कामांना सुरुवात करा. त्यानंतर गरजेनुसार पुढील निधी देण्यात येईल, असे आश्वासन आ. डॉ. शिंगणे दिले. युवकांनी सुद्धा नवीन गावठाणात विविध विकास कामे नेटाने करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. याप्रसंगी राम राठोड, आत्माराम कायंदे, मधुकर गव्हाड, बी. डी. खरात, रावसाहेब कायंदे, प्रफुल्ल कायंदे, विनोद जायभाये यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...