आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:19 वर्षीय नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

मोताळा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका १९ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात अँगलला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास पिंपळखुटा येथे उघडकीस आली. फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली

मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील उर्मिला सागर उर्फ संगीत उमाळे वय १९ या विवाहितेने १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घरातील सदस्य बाहेर अंगणात बसलेले असताना राहत्या घरात दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळताच सपोनि विकास पाटील, नापोका विजय पैठणे, नापोका अमोल खराडे, नापोका रमेश नरोटे, चालक खडसे यांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठवले. सागर उर्फ संगीत उमाळे यांच्या फिर्यादीनुसार नोंद केली असून पुढील तपास सपोनि विकास पाटील हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...