आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाची मागणी:बँक कर्मचाऱ्यांनी बनावट सही करून 2 लाख लाटले

चिखली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली असता, तत्कालीन बँक अधिकाऱ्यांनी बनावट सही करून आणखी परस्पर दोन लाख रुपये वळवल्याची तक्रार येथील भारत माळोदे यांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात केली आहे.या तक्रारीत माळोदे यांनी नमूद केले आहे की, २०१२ मध्ये बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत त्यांनी तीन लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. यासाठी दोन जामीनदारांसह कागदपत्रे दिल्यानंतर १५ टक्के व्याज दराने त्यांना कर्ज मिळाले. दरम्यान, कर्जाचा नियमित भरणा केल्यानंतरही १ ऑगस्ट २०१९ रोजी बँकेकडून चार लाख रुपये कर्ज घेतल्याची नोटीस मिळाली. त्यामुळे त्यांनी बँकेकडे खाते उताऱ्याच्या नकलेची मागणी केली. त्यानंतर परस्पर दोन लाख रुपये वळवण्यात आल्याचे समोर आहे. तत्कालीन शाखा व्यवस्थापक सुभाष डांगे आणि कर्मचारी गजानन महाजन यांनी माझ्या खात्यातून माझी बनावट सही करून माझ्या नावाने मागणी केल्याप्रमाणे तीन लाख रुपये मंजूर झाले असताना परस्पर दोन लाख रुपये वळवले. तसेच दि. २७ मार्च २०१२ रोजी माझ्या सहीचा दुरुपयोग करून दोन लाख रुपये परस्पर काढून फसवणूक केली, असे माळोदेंनी तक्रारीत म्हटले.

बातम्या आणखी आहेत...