आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 बछडे:उत्रादा शिवारात आढळली बिबट्याची 2 बछडे

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली तालुक्यातील उत्रादा शिवारात गुरुवारी दुपारच्या सुमारास बिबट्याची दोन बछडे आढळून आली. यावरुन या परिसरात मादी बिबट्याचे वास्तव्य असल्याचे स्पष्टहोत आहे. अचानक बिबट्याच्या दोन बछड्यांचे दर्शन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, याबाबत माजी सरपंच रमेश इंगळे यांनी वनअधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी कोणतीही ठोस पावले न उचलता ‘शेतकऱ्यांना त्या बछड्यांजवळ जाऊ देऊनका, मादी तिचे पिल्ले घेऊन जाईल’, असासल्ला दिला आहे.

शेजारीच ज्ञानगंगा अभयारण्य असल्यामुळे धोत्रा भानगोजी, उत्रादा व करवंड शिवारात जंगली जनावरांचा मुक्त संचार असतो. कधी शेतकऱ्यांवर आस्वालाच्या, तर कधीबिबट्याच्या हल्ल्याचा घटना घडताहेत. तसेच नीलगाई, रानडुकरांचे कळप पिकांचे नुकसान करताहेत. दरम्यान गुरुवारी दुपारच्या सुमारास काही शेतकऱ्यांना अंदाजेतीन ते चार महिन्यांची बिबट्याची दोन बछडे आढळून आले. यावेळी काही शेतकऱ्यांनी त्यांचे फोटोही काढले. परंतु त्या बिबट्याच्या बछड्याजवळ कोणीही जाऊ नका, असा सल्ला वन अधिकाऱ्याने दिला आहे. परंतु भविष्यात काही विपरीत घडले तर त्याला जबाबदार कोण राहणार, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.भविष्यातील अनुचित घटना टाळण्यासाठी मादी बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी उत्रादा परिसरातील शेतकरी करत आहेत. वन विभागाने ताबडतोब या बछड्यांचा बंदोबस्ताची मागणी होत आहे.

वन अधिकाऱ्यांनी दिला सावधानतेचा इशारा

या प्रकाराबाबत काही शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी त्या परिसरात न जाण्याचा सल्ला दिला असून, शेतकऱ्यांनी व परिसरातीलनागरिकांनी सावध रहावे असे त्यांनी सांगितले. मात्र, मादी बिबट्याचा बंदोबस्त करण्याऐवजी वन अधिकारी खुर्चीवर बसून सल्ला देण्याचे काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बिबट्याच्या बछड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...