आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधन सणाला महागाईची झळ:यंदा राख्यांच्या किंमतीत 20 टक्के वाढ; विविधरंगी राख्यांचे आकर्षण

खामगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहीण-भावाचे अतुल नाते सांगणाऱ्या रक्षाबंधन सणाला अवघे नऊ दिवसांचा कालावधी राहिला आहे. शहरातील विविध भागात रंगीबेरंगी राख्यांची दुकाने सजली आहे. या मार्गावरुन ये-जा करणाऱ्यांचे राख्या लक्ष वेधून घेत आहेत. यंदा राख्यांच्या किमतीमध्ये २० टक्के दर वाढ झाल्यामुळे महागाईची झळ रक्षाबंधनावर आली आहे. तरी देखील बाहेरगावी राहणाऱ्या भावांना राखी पाठवण्यासाठी बहिणीची लगबग दिसून येत आहे.

रक्षाबंधन हिंदू संस्कृती नुसार श्रावणातील नारळी पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. यंदा ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. त्यासोबतच बहिणीच्या रक्षणाचे वचन भाऊ देतो. मागील दोन वर्षापासून कोरोना काळातील राखी पौर्णिमा उत्साहाने साजरी करता आली नाही. परंतु आता सर्वप्रकारचे निर्बंध हटवण्यात आल्याने यंदा बहीण, भाऊ या सणाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी राख्यांचे दर बहिणीच्या आवाक्यात होते. परंतु यंदा राख्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. शहरातील राख्या विक्रेत्यांनी आपल्या दुकानात विविध प्रकारच्या राख्या विक्रीस आणल्या आहेत. काही बहिणींनी आपल्या लाडक्या भावाकरीता हॅण्डमेड, ब्रेसलेट्स राख्यांना पसंती दिली आहे. यासोबतच छोटाभीम, डोरेमान, पोगो आदी कार्टून राख्यांचे लहान मुलांना आकर्षण आहे.