आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑनलाइन पध्दतीने फसवणूक करण्याचा आणखी एक नवा फंडा नुकताच खामगाव येथे उघडकीस आला आहे. इलेक्ट्रिक बिल अपडेट करण्यासाठी एक लिंक पाठवून व्यक्तीच्या खात्यातून अज्ञाताने २० हजार रुपये परस्पर लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
खामगाव शहरालगत असलेल्या घाटपुरी येथील संजय वसंतराव देशमुख (४९) यांना रविवार ११ डिसेंबर रोजी दुपारी फोन आला की, मी इलेक्ट्रीकसीटी अपडेट ऑफिसमधून बोलतो तुमचे चार महिन्यांचे बिल बाकी आहे ते तुम्ही भरले का? भरले असेल तर ते आमच्यापर्यंत पोहोचले नाही. असे म्हणून तुमचे बील अपडेट करण्यासाठी तुम्ही ७६७९०५६२१७ या नंबरवर १० रु. पाठवा मी तुम्हाला एक लिंक पाठवतो.
त्यावर क्लिक करा नंतर तुमचे इलेक्ट्रिक बिल अपडेट होईल असे सांगितले. त्याप्रमाणे देशमुख यांनी सदर नंबरवर आधी ऑनलाइन १० रुपये पाठवले. त्यानंतर त्याच नंबरवरून आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक केले. काही वेळाने त्यांच्या बँक खात्यातून २० हजार ३२८ रुपये कपात झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संजय देशमुख हे तक्रार देण्यासाठी शहर पोलीस स्टेशनला आले होते. मात्र त्यांना सर्व डिटेल कागदपत्र आणण्यास सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकाराची चर्चा होत असून नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना सावधान राहणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.