आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैद:भरदिवसा दुकानामधून 22 हजार रुपये लंपास; चोरटा झाला सीसीटीव्हीत कैद

मोताळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आठवडी बाजार ते बस स्थानक मार्गावरील मीना ऑप्टिकल या चष्म्याच्या दुकानातून बावीस हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचायत समितीसमोर मो. फारूक यांचे मीना ऑप्टिकल नावाचे चष्म्याचे दुकान आहे. दरम्यान १२ मे रोजी त्यांनी दुकानातील गल्ल्यात व्यापाऱ्याला पैसे देण्यासाठी ठेवले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास मो. फारूक हे जेवणाचा डबा आणण्यासाठी घराकडे गेले. त्यावेळी त्यांनी दुकानात जाण्याच्या रस्त्यात स्टूल ठेवला व त्यावर झाडू ठेवला. दहा मिनिटानंतर ते डबा घेऊन परत दुकानात आले असता, त्यांना स्टूल आणी झाडू हे अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी शेजारी विचारणा केली असता दुकानात कोणीच आले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतु, फारूक यांना संशय आल्यामुळे त्यांनी दुकानात जाऊन गल्ला उघडून पाहिले असता त्यांना गल्ल्यात ठेवलेले २२ हजार रुपये दिसून आले नाही. त्यामुळे ही रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यामध्ये वीस ते बावीस वर्षाचा युवक गल्ल्यातून पैसे काढताना दिसून आला. प्रकरणी त्यांनी बोराखेडी पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नंदकिशोर धांडे हे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...